Thursday 23 June 2022

अल्पसंख्यांक बहुल शैक्षणिक संस्थासाठी अनुदान योजना 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


     जालना दि. 23 (जिमाका) :-अल्पसंख्याक विकास विभागाच्या दि. 7 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनाच्या खाजगी शाळा,कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.

      महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग यांच्या परिपत्रकानुसार 2022-23 या वर्षासाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याने अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहूल शासन मान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची शिफारस करण्याचे निर्देश दिले आहे. यास अनुसरुन या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचा अवलंब करुन तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शाळांनी, संस्थांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे कागदपत्रे जोडून सदर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम दि. 31 जुलै 2022 पर्यंत आहे. तसेच सदर योजनेच्या अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय अंतर्गत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या  https://mdd.maharashtra.com  संकेतस्थळावर योजना शैक्षणिक अंतर्गत शासन निर्णयासोबत अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.  https://jalna.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

 


No comments:

Post a Comment