Thursday 9 June 2022

महाज्योतीतर्फे जालना येथे 11 जून रोजी निःशुल्क प्रवेशासह 'तृतीय स्वर’ नाट्य प्रयोग

 


           जालना दि.8 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दिनांक 11 जूनला सायंकाळी 7 वाजता 'तृतीय रत्न' या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रयोगासाठी निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणीक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा,

 त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित 'तृतीय रत्न' नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

    अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात 31 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे.  या नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment