Thursday 16 June 2022

इयत्ता 10 वी चा निकाल 17 जुन रोजी

 


     जालना दि. 16 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च – एप्रिली 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात आला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दि. 17 जून 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.  

      इसत्ता 10 वी मार्च-एप्रिल 2022 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व या माहितीची प्रत घेता येईल. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्त पुढीलप्रमाणे आहेत.

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

http://mh10.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

      परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सव्र विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व या माहितीची प्रत घेता येईल.

     www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

  तसेच www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. अशी माहिती डॉ. अशोक भोसले सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment