Thursday 16 June 2022

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना दि. 16 (जिमाका) :-  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावयायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या माध्यमातुन आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.  जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासुन वंचित राहू नये. यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी ज्या जिल्ह्यातुन जातीचा दाखला काढलेला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन उपायुक्त  जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment