Monday 27 June 2022

विशेष घटक योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 


         

    जालना दि. 27 (जिमाका) :- संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय विशेष घटक योजना (अनुदान योजना) व बीजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

   संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना उद्दिष्ट 40 व बीजभांडवल योजना उद्दिष्ट 16 असे प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात चांभार समाज अंतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही.

कर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडुन घेतलेला असावा), अर्जदानाचा उत्पन्नाचा दाखला चालु वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा) नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्या, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, राशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक कोटेशन , व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे. त्या जागेची भाडेपावती, करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा, नमुना नं. 8, लाईटबिल, टॅक्सपावती, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्राम पंचायत, नगर पालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्या बाबत प्रतिज्ञापत्र वरील प्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र द्यावे.

     वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज दि. 1 जुलै 2022 पासुन ते 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज वाटप व स्वीकृती कार्यालयीन वेळेत सकाळी 9.30 ते  6.15 पर्यंत स्थळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या ठिकाणी स्वीकारले जातील.

     जालना जिल्‌ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजु अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अरुण राऊत जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-    

No comments:

Post a Comment