Friday 17 June 2022

पर्यावरण विषयक जाहीर सुनावणीचे 7 जुलै रोजी दुपारी 2.30 वा. आयोजन

 


 

जालना दि. 17 (जिमाका) :-   वने व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या दि. 14 सप्टेंबर 2006 रोजीच्या अधिसूचनेनुसार मे.भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्स प्रा.लि. गट नं. 30 गाव दरेगाव (अतिरिक्त एमआयडीसी बाजूस) ता. जि. जालना या प्रस्तावित विस्तार प्रकल्पामध्ये एमएस बिलेटस 750 टीपीडी ते 2 हजार टीपीडी आणि (रोलिंग मील) टीएमटी बारस 833.33 टीपीडी ते 2000 टीपीडीचे उत्पादन करण्याबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज प्राप्त झालेला असून या प्रस्तावित नवीन प्रकल्पाकरीता मे. भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्स प्रा. लि. गट नं.30, गाव दरेगाव (अतिरिक्त एमआयडीसी, बाजूस) ता. जि. जालना या ठिकाणी दि.7 जुलै 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता पर्यावरणविषयक जाहीर  लोकसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

   या प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात विचार, टिका, टिप्प्णी सादर करायची असल्यास वृत्त प्रसिध्द झाल्यापासून जाहीर सुनावणीच्या तारखेपूर्वी उप-प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2, जालना  या पत्त्यावर अथवा ईमेल- srojalna@mpcb.gov.in,   वेब - www.mpcb.gov.in या ठिकाणी सादर करावी.

या प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, या प्रकल्पामुळे अन्यप्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना या प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिपण्णी तोंडी किंवा  लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यानसुध्दा नोंदविता येतील.

या प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्ताऐवज (इंग्रजी व मराठी) मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,  जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, नगर परिषद, तहसिलदार, तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, दरेगाव, ता.जि. जालना, उप प्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि. मंडळ, प्लॉट नं. पी-3/ 1 व पी-3/2, अतिरिक्त एमआयडीसी फेज-2, जालना प्रादेशिक कार्यालय, म.प्र.नि. मंडळ, भूखंड क्र. ए-4/1, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यालय, कल्पतरु पॉईंट, 3 रा माळा, सायन माटुंगा स्कीम रोड नं.8, सायन सर्कलसमोर, सायन (पूर्व), मुंबई -22, पर्यावरण विभाग, नवीन प्रशासन भवन, 15 वा मजला, मादामा कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32, प्रादेशिक कार्यालय, पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालय, पश्चिम मध्य विभाग, तळमजला, पूर्व विंग, नवीन सचिवालय इमारत, सिव्हिल लाईन, नागपुर या ठिकाणी उपलब्ध असुन संबंधित व्यक्ती खालील कार्यालयामध्ये ही कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील, असे माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी सो.म. कुरमुडे यांनी कळवले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment