Tuesday 2 August 2022

राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत प्रलंबित कामे डीपीआरनुसार प्राधान्याने पुर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड



           जालना, दि. 2 (जिमाका):- केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेंतर्गत परतूर तालुक्यातील 16 गावाच्या सर्वांगिण विकासासाठीची कामे डीपीआरनुसार पुर्ण करण्याची जबाबदारी त्या त्या विभागाची असुन प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय नियामक समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक व्ही.के. खिल्लारे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ए.के. नंदनवनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती विद्या कानडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ, कार्यकारी अभियंता ए.ए.चौरे,परतुरचे गटविकास अधिकारी ए.जी. गोळनवार यांच्यासह संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, परतुर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांच्या सर्वांगिण विकासासाठी  राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला होता.  या गावांमध्ये विकास कामाचा डीपीआर तयार करण्यात येऊन त्यानुसार निधीचे वितरणही करण्यात आले आहे.  ज्या विभागांची कामे अद्यापही प्रलंबित असतील ती कामे प्राधान्याने पुर्ण करुन घेण्यात यावीत. 

            यावेळी ‍जिल्हाधिकाऱ्यांनी 16 गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सिमेंट काँक्रीटीकरण, शाळांना आवारभिंतीचे बांधकाम, बसस्थानक, मिनी एमआयडीसीसाठी युनिट शेड, प्रशासकीय ईमारत, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस, आवारभिंत यासह ईतर कामांचा विस्तृत आढावाही घेतला.

-*-*-*-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment