Friday 5 August 2022

असंघटीत कामगारांनी ई-श्रम कार्डसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 


       जालना दि.  5 (जिमाका) :-   जालना जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम कार्डच्या नोंदणीसाठी ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करुन लाभ घेण्यासाठी दि.3 व 4 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर (सीएससी) जाऊन नोंदणी करावी. नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामुल्य आहे. जालना जिल्ह्यासाठी 8 लाख 81 हजार 452 एवढे उद्दिष्ट दिलेले असून त्यापैकी 2 लाख 39 हजार 616 असंघटीत कामगारांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक, सक्रीय मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक) असावा.  तरी जालना जिल्हयातील सर्व असंघटीत कामगारांनी विशेष नोंदणी अभियाना अंतर्गत ई-श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर (सीएससी) जाऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.मा. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment