Friday 5 August 2022

भरती मेळाव्याचे 12 सप्टेंबर रोजी आयोजन

 


जालना, दि. 5 (जिमाका) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना येथे बीटीआरआय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  तथापि सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या दि.8 ऑगस्ट 2022 पासून परीक्षा असल्यामुळे  दि. 8 ऑगस्ट 2022  रोजीचा  भरती  मेळावा  रद्द़  करण्यात आला आहे. हा भरती मेळावा आता सप्टेंबर महिन्याच्या दुस-या सोमवारी  दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अंशकालीन प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.     

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment