Monday 1 August 2022

गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी सहायक निबंधक, सहकारी संस्था, कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन

 


 

     जालना, दि. 1 (जिमाका):-  जिल्ह्यातील गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव यांची  दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संदर्भात  खालील विषयावर सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांच्या कार्यालयात कार्यशाळा आयोजित केली आहे.

    या कार्यशाळेमध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून गृहनिर्माण सहकारी संस्था- संचालक मंडळ निवडणुक, गृहनिर्माण सहकारी संस्था-सुव्यवस्थापन आणि तंटामुक्ती अभियान, मानिव अभिहस्तांतरण, व भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान.

     गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांच्या कार्यालयात उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment