Friday 5 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

 


     जालना दि.  5 (जिमाका) :-   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  दि. 12 मार्च 2021 पासून विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन संपुर्ण देशभर करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यात विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

            दि.8 ऑगस्ट 2022  रोजी सायंकाळी 6.00 वाजता योग व सुर्यनमस्कार स्थळ – जिल्हा क्रीडा संकुल,जालना, दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता  खो-खो क्रीडा स्पर्धा वयोगट 14 ते 17 वर्षे आतील मुले व मुली स्थळ- कै.नानासाहेब पाटील विद्यालय, नजिक पांगरी ता. बदनापुर जि. जालना, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता क्रीडा संघटक व खेळाडू यांची अमृत महोत्सव व हर घर तिरंगा निमीत्त प्रभात फेरी स्थळ  - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना – शासकीय रुग्णालय- शनि मंदिर चौक- कचेरी रोड- छत्रपती संभाजी महाराज उद्यान (मोतीबाग), जालना, दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 9.00 वाजता  फुटबॉल खुला गट पुरुष क्रीडा स्पर्धा   स्थळ- आजाद मैदान, गुरुबच्चन चौक, जालना, दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता कबड्डी क्रीडा स्पर्धा वयोगट 14,17 वर्षे आतील मुले व मुली स्थळ- जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी,नगर परिषद जवळ , जालना.    

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धेत व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग व्हावे अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, महंमद शेख, संतोष वाबळे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment