Monday 8 August 2022

अन्न सुरक्षा सप्ताहानिमित्त पाककृती स्पर्धा

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :-   अन्न व औषध प्रशासनातर्फे दि. 5 ऑगस्ट  ते 12 ऑगस्ट हा आठवडा अन्न सुरक्षा सप्ताह म्हणुन साजरा केला जात आहे. यानिमित्त अन्न  व औषध प्रशासनातर्फे विविध जन जागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणुन महिलांसाठी कमी तेल, साखर, मीठ वापरुन तयार केलेल्या पाक कृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. साखर, तेल, मीठ यांच्या अतिरिक्त सेवनामुळे मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजार होतात त्यामुळे आहारात यांचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सदर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेमध्ये तेल, साखर व मीठ यांचे प्रमाण कमीत कमी ठेऊन पाककृतींची रेसिपी दाखल करायची आहे. यासाठी अशा नाविन्यपुर्ण रेसिपींचा एक छोटा व्हिडीओ तयार करुन तो अन्न व औषध प्रशासन जालना कार्यालयाचे ई – मेल acfoodjalna@gmail.com  वर पाठवायचा आहे. प्राप्त प्रवेशिकांमधून उत्कृष्ट रेसिपींचा निवड करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पराग नलावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment