जालना, दि. 26 (जिमाका):- राज्यामध्ये ई-पीक पहाणी प्रकल्प दि. 15 ऑगस्ट,
2021 पासुन सुरु झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची
नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याच्या सूचना दिल्या
असुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकाची नोंद ई-पीक पहाणी ॲपमध्ये करण्याचे आवाहनही
एका पत्रकाद्वारे केले आहे.
शेतकऱ्यांनी https://play.google.com/store/
साखर कारखान्यांच्या शेती विभागामार्फत ऊसाच्या नोंदी करण्यासाठी ई-पीक पहाणी
ॲपद्वारे करण्यासाठी कारखाना व गट ऑफीसस्तरावर मोबाईल ॲप सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच
तलाठी व कृषि सहाय्यकांची यासाठी मदत घ्यावी. गाळप हंगाम 2021-22 सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या ऊस पिकांच्या नोंदी
गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये होतील, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही
पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
*******
No comments:
Post a Comment