Wednesday 10 August 2022

जिल्ह्यातील पतसंस्थासाठी 12 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन

 


 

जालना, दि. 10 (जिमाका) :-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सहकार भारती, पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्था नियामक मंडळ, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तसेच आर्थिक साक्षरता या विषयांवर योगीराज सुर्वे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांच्‍या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दि. 10.00 वाजता करंदीकर हॉल, देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना टाऊन हॉल जवळ, कचेरी रोड, जुना जालना येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यशाळेत  नितीन वाणी, सहकार तज्ञ, पुणे तसेच सचिन वाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment