Thursday 4 August 2022

ओबीसी महामंडळाच्या योजनेच्या कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन

 


     जालना, दि. 4 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन 2022-23 या वित्तीय वर्षा करीता महामंडळाच्या ऑफलाइन थेट कर्ज योजनेत 120 प्रकरणाचे  व बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या 20 टक्के बीज भांडवल योजनेअंतर्गत 47 प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या ऑनलाइन वैयक्तिक व्याज परतावा योजनेत 119, गट कर्ज व्याज परतावा 13 व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचे 11 प्रकरणांचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे. यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतलेल्या वय 18 ते 50 वर्ष असलेल्या इतर मागासवर्गीय कुटुंबातील वैयक्तिक अर्जदारांना उद्योग, व्यवसाय व शिक्षण पुर्ण करण्यासाठी वरील प्राप्त उद्दिष्टानुसार विविध बँका व महामंडळातर्फे तालुका निहाय तसेच थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव अर्ज संपेपर्यंत उपलब्ध केले जाणार आहेत.

            अर्जदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.  इच्छुक अर्जदारांना कर्ज अर्ज मागणी करतेवेळी अर्ज जातीचे प्रमाणपत्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.

            परिपुर्ण कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत दाखल करतेवेळेस मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात सादर केल्याशिवाय कर्ज प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. अर्जदारा व्यतिरिक्त इतर व्यक्तीकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही.

            सर्व कागदपत्रासह परिपुर्ण असलेले कर्ज प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येतील. उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या उपस्थित सदस्यांसमोर त्यांच्या मान्यतेने लकी ड्रॉ ने लाभार्थींची निवड करण्यात येईल. पात्र व निवड झालेल्या अर्जदारांची तालुकानिहाय यादी जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर निवड समितीच्या मान्यतेनंतर त्वरित लावण्यात येईल. वरीलप्रमाणे कर्ज प्रस्ताव पुढील मंजुरीकरीता योजनानिहाय बँकेकडे, महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील. या योजने अंतर्गत मंजुरीपूर्व व (वैधानिक कागदपत्रे) मंजुरीनंतरच्या दस्ताऐवजाची महामंडळाच्या अटी व शर्ती ची माहिती कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, यांच्याशी दुरध्वनी क्र. 02482 – 223420 वर संपर्क साधावा ऑनलाइन योजनेकरीता महामंडळाच्या बेवपोर्टल  www.msobcfdc.org  या संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment