Friday 12 August 2022

शासकीय तंत्रनिकेतन येथे अभियांत्रिकी पदविका प्रवेश मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


जालना दि. 11 (जिमाका) :-  तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पदविका नोंदणीची प्रकिया. सर्व शासकीय तंत्रनिकेतनात सुरु झालेली असुन तंत्रशिक्षणाचे महत्व ,पदवीका उत्तीर्ण झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी, ऑप्शन फॉर्म व इतर महत्वाच्या विषयांवर शासकीय तंत्रनिकेतन , जालना येथे दि. 6 ऑगस्ट रोजी अभियांत्रिकी पदवीका मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतन , जालना संस्थेचे प्राचार्य तथा नोडल ऑफिसर डॉ. मगेश डी. वाघमारे याच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा कोळंबीकर यांनी केले. त्यानंतर संस्थेचे प्राचार्य तथा नोडल ऑफिसर डॉ. मंगेश डी. वाघमारे यांनी  विदयार्थांना प्रवेश प्रक्रियेबदल सविंस्तरपणे मार्गदर्शन केले  नरेश. संगम यांनी शासकीय तंत्रनिकेतन, नागेवाडी जालना या संस्थेबद्दल माहिती, संस्थेत उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची व अल्पसंख्याक पाळी बद्दलची माहिती ऑप्शन फॉर्म योग्य पध्दतीने भरण्याबाबतचे सखोल मार्गदर्शन ,पदविका पुर्ण केल्यानंतर असणाऱ्या विविध संधीची माहिती विदयार्थ्याना सविस्तर पध्दतीने देण्यात आली. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेचे समन्वयेचे समन्वयक अब्दुल वासे सिद्दीकी यांनी विदर्थ्यांचे व पालकांचे प्रवेश प्रकियेबद्दलचे प्रश्नांची उत्तरे दिली व त्यांचे शंका निरसन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर. एन. झरेकर यांनी केले. अशी माहिती शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment