Thursday 4 August 2022

गटई कामगारांना अर्ज करण्याचे आवाहन

 


      जालना, दि. 4 (जिमाका) :- गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्याची योजना सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली असून अनुसूचित जातीतील  (अनु. क्र. 11)  या प्रवर्गातील, गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल 100 टक्के अनुदानावर वाटप योजनेंतर्गत जालना जिल्‌ह्यातील पात्र लाभार्थ्यांना (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळून) आपले अर्ज, सन 2022-23 करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, या कार्यालयात दि. 19.8.2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत परीपुर्ण व स्वसाक्षांकित करुन सादर करावे  असे आवाहन सहाय्‌यक आयुक्त, समाज कल्याण, अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment