Wednesday 10 August 2022

“घरोघरी तिरंगा” व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षणार्थींची दौड व वाहन रॅली संपन्न

 




                जालना, दि. 10 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अृमत महोत्सवांतर्गत घरोघरी तिरंगा व स्वराज्य महोत्सवानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीची जालना शहरात अमृत महोत्सवी दौड, वाहन रॅली संपन्न झाली.

            पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये उपप्राचार्य श्रीमती पी. डी. यादव, पोलीस निरीक्षक एच. पी. नांदेडे, पोलीस उपनिरीक्षक आय. ए. शेख,, एच. एन. अहिर, ए. एम. शेख, ए. पी. जाधव, एस. एन. उसरे, पी. डी. यादव, बी. एच. जाधव, पी. पी. गायकवाड तसेच कवायत प्रशिक्षक श्री. उबाळे, श्री. दहिफळे, श्री. मुंडे, श्री. नारियलवाले सय्यद, श्री. गायकवाड,श्री. खान,श्री. ताटे, एल. एन. गायकवाड, जेवळ ढवळे. श्री. नाथजोगी,श्री. खिल्लारे,श्री. शहा,  श्री. सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी  राखीव पोलीस उपनिरीक्षक पी.पी. गायकवाड यांच्यासह पोलीसांनी राष्ट्रीय ध्वजासह संचलन केले. मोटार परिवहन विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावून देशभक्तीपर गीतांसह यशस्वीरित्या रॅली संपन्न झाली.  या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील एकुण 542 प्रशिक्षणार्थींनी दौडमध्ये उत्स्फूर्तपणे  सहभाग घेत जालना शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment