Friday 5 August 2022

जिल्हा परिषद विभाग, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2022 आरक्षण व मतदार यादी कार्यक्रमास स्थगिती

 


     जालना, दि. 5 (जिमाका) :-  दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद आणि  पंचायत समित्यांमध्ये जागांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बुथनिहाय अंतिम मतदार यादी जारी करण्यात येणार होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता केलेल्या मतदार याद्यांच्या आणि आरक्षणाच्या प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत,अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment