Thursday 4 August 2022

दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 


    जालना, दि. 4 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसाटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व ईतर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

         तरी सर्व संबंधीतांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेवून आपली जातीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत असे आव्हान सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राजेश अहिर, यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment