Monday 1 August 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



            जालना, दि. 1 : -  साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

            यावेळी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले, तहसिलदार (महसुल) प्रशांत पडघन यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

*******

No comments:

Post a Comment