Thursday 11 August 2022

पोलीस दलातील विविध उपक्रमांचे 13 ऑगस्टला प्रदर्शन

 


 

    जालना दि. 11 (जिमाका) :-  “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त्‍ जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.00 ते  4.00 वाजेच्या दरम्यान शोभा प्रकाश मंगल कार्यालय, ट्राफिक कार्यालयाच्या बाजुला, जालना येथे पोलीस दलातील विविध कार्यक्रमाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सायबर क्राईम, बॉम्ब शोध पथक कार्यपध्दती, श्वान पथक, दामिणी पथक, महिला संरक्षण संबंधीत माहिती, पोलीस दीदी व पोलीस काका यांचेशी संवाद, डायल 112, वाहतुक नियमन संबंधीत जनजागृती, पोलीस शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

     तरी विद्यार्थी, तरुण- तरुणी, महिला, सर्व नागरिक, पत्रकार बंधु ,भगिनी व्यावसायीक यांनी सदर प्रदर्शनास भेट द्यावी प्रदर्शन हे निशुक्ल आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment