Thursday 4 August 2022

जिल्हा माहिती कार्यालयातील महिंद्रा बोलेरो गाडीचे जुने टायर व निरुपयोगी भंगार विक्रीसाठी दर पत्रके सादर करण्याचे आवाहन

 



     जालना, दि. 4 (जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालयातील, बोलेरो गाडीचे जुने टायर, निरुपयोगी
 विविध वस्तु व भंगार विक्री करावयाचे आहे. टायर, वस्तु व भंगार खरेदी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी टायराचे एका नगासह तसेच निरुपयोगी भंगाराचे दर स्वतंत्रयपणे वेगवेगळया पाकिटात बंद करुन जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत , तळ मजला जालना येथे दि. 04 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2022 पर्यंत सुटीचे दिवस वगळुन कार्यालयात जमा करावे त्यानंतर आलेले दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. असे जिल्हा माहिती अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment