Tuesday 2 August 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भरती मेळाव्याचे आयोजन

 


 

जालना, दि. 2 (जिमाका):- आयटीआय उत्तीर्ण व जे प्रशिक्षणार्थी परिक्षेच्या अंतिम वर्षाला पात्र आहेत अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना या ठिकाणी दि.8 ऑगस्ट 2022 रोजी  बीटीआरआय व सेवायोजन कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्यासाठी औरंगाबाद येथील नामाकित कंपन्या व जालना येथील नामांकित कंपन्या सहभाग घेणार आहेत तरि आयटीआया उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यात सहभागी होऊन आजच आपली नोकरी पक्की करा व आपल्या कुटूंबाचा आधार बना या भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी टीसी,मार्कशिट,आधारकार्ड,पॅनकार्ड,पासपोर्ट फोटो सोबत आनने  अनिवार्य राहिल या भरती मेळाव्यात उत्तीर्ण व परिक्षेला पात्र असणारे सर्व व्यवसायातील उमेदवार सहभागी होण्याचे आव्हाण सहप्रशिक्षणार्थी सल्लागार बीटीआरआय जालना के.बी.ठाकुर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्यौजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालय सह.आयुक्त चाटे यांनी केले आहे.

       तरी आयटीआय उत्तीर्ण व जे प्रशिक्षणार्थी परिक्षेच्या अंतिम वर्षाला पात्र आहेत आशा उमेदवारांनी जास्तित जास्त संख्येने उपस्थित रहावे .

दि. 23 मार्च 2022 रोजी औद्यागिक प्रशिक्षण संस्था , जालना येथे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS ) अंतर्गत 07 दिवशीय शिबीराचे उदघाटन करण्यात आले .प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य विकास हा त्यांच्या प्रशिक्षणातून तर होतोच पण प्रशिक्षणार्थ्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्याचा शारिरीक,सामाजिक,देशसेवा,व राष्ट्रीय प्रेम या सर्वांगिण गुणांचा विकास व्हावा त्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना या शिबीरावचे आयोजन करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार दिगंबरराव उखळीकर प्राचार्य औ.प्र.संस्था , जालना हे होते व या कार्यक्रमाचे उदघाटक श्री संपतराव चाटे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व उद्योजकता विभाग जालना .हे होते प्रमुख अतिथी म्हणून शिंदे साहेब पी.एस.आय. चंदनझिरा पो.स्टे. जालना त्याच वरोबर या संस्थेचे एस.एस.कापसे ( ग.नि.) व यु.बी. जाधव ( ग.नि. ) हे होते व शैक्षणिक संस्थेतील संपूर्ण कर्मचारी वर्ग सुध्दा उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.कापसे (ग.नि.) यांनी केले तर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे उदघाटक संपतराव चाटे साहेब व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .पविणकुमार उखळीकर साहेब यांनी केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.जी.कदम (शि.नि.) तर आभार प्रदर्शन. यु.बी. जाधव (ग.नि.) यांनी केले

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment