Wednesday 3 August 2022

गणेश मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 3 (जिमाका) :-   गणेशोत्सव 2022 साठी सहायक धर्मादाय आयुक्त  कार्यालयाकडून दिली जाणारी वर्गणी गोळा करण्यासाठीची परवानगी ऑनलाईन पध्दतीने दि.4 ऑगस्ट 2022 पासून देण्यात येणार असून संबंधित गणेश मंडळांनी charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन फॉर्म भरुन त्याला गणेश मंडळाचा ठराव, ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, लाईट बिल, सर्व सभासदांचे आधार, पॅन कार्डची प्रत मागील वर्षी परवानगी घेतलेली असल्यास त्या परवानगीची  प्रत व मागील वर्षीचे हिशोब पत्र स्कॅन करुन ॲटच करावे.

फॉर्म भरण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन वेबसाईट साईटच्या होम पेज वरील प्रणाली मार्गदर्शन या सदरा खाली 41 क परवानगी मार्गदर्शन यामध्ये उपलब्ध आहे. अर्ज बरोबर व नियमानुसार असल्यास अर्जात नमुद ई मेलवर परवानगी पत्र पाठवण्यात येईल अथवा त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी कळवण्यात येईल. ऑनलाईन पध्दतीने ई मेलवर परवानगी देण्यात येणार असल्याने कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच ऐन वेळेवर गर्दीमुळे येणाऱ्या तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता पाहता गणेश मंडळांनी लवकरात लवकर परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त वि.स.मेंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment