Thursday 11 August 2022

जिल्हा कारागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

 


      जालना दि. 11 (जिमाका) :-   आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हा कारागृहातील बंदीस्त असलेल्या बंदीजना करीता जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतीक कार्यक्रमाचे दि.11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आले होते.

            या कार्यक्रमामध्ये प्रबोधनाकरीता 6 महिला व 13 पुरुष कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे वेळी 270 बंद्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला, सदर कार्यक्रमाच्यावेळी कारागृह अधीक्षक अशिष रा. गोसावी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस.एल. आडे, बी.जे. जाधव, तु.अ. एस.एल. घुले हे उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.एल. आडे  यांनी केले. अशी माहिती अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग-1 आशिष रा. गोसावी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment