Friday 16 December 2022

ग्रामपंचायत निवडणूक; मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 16 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील कामगारांना दि. 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात किंवा लगतच्या क्षेत्रात मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

           जिल्ह्यात रविवार, दि. 18 डिसेंबर 2022  रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत असून या दिवशी सर्व निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना दिनांक 18डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावणेसाठी भरपगारी सुटृटी जाहीर करावी तसेच निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती येथे मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधीत ग्रामपंचायतीमधील  मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीची विशेष सवलत देण्यात यावी. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दि. 14 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये तसेच उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जालना यांनी त्यांच्या दि. 15 डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये आदेशीत केले आहे. असेही प्रसिध्दी पत्रकाव्दारे  कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment