Friday 9 December 2022

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 9 (जिमाका) : ग्रामीण युवक मंडळांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालयांतर्गत नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा युवा मंडळ पुरस्कार योजना सुरु केली आहे. नेहरू युवा केंद्र जालनाशी संलग्नीत युवा वर्गाकरिता काम करणारे व संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत पंजीकृत युवा मंडळे पुरस्काराकरिता अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता 24 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

आरोग्य, कुंटुब कल्याण, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, महिला सक्षमीकरण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, सामाजिक समस्या व स्थानिक प्रश्नांचे निराकरण, ग्राम स्वच्छता आदी क्षेत्रातील योगदानाच्या आधारे जिल्हा निवड समिती जिल्हास्तरावरील जिल्हा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराकरिता 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील केलेले कार्य ग्राह्य धरुन युवा मंडळाची निवड करण्यात येतील. मागील दोन वर्षांत ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते या पुरस्काराकरिता पात्र ठरणार नाही.  

पुरस्काराचे स्वरुप रुपये 25  हजार रूपये व प्रमाणपत्र असे राहील. प्रस्ताव अर्जाच्या स्वरूपात युवा मंडळाचे नाव व पत्ता, अध्यक्षाचे नाव व पत्ता व सचिवाचे नाव व पत्ता, युवा निवडणूक ( शेवटी ) झाल्याची तारीख, वर्ष, युवा मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे सदस्य (स्त्री व पुरुष) संख्या, युवा मंडळाचा संक्षिप्त इतिहास व आजपर्यंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा सारांश, वर्तमानपत्राची कात्रणे, आर्थिक वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे विवरण आदि सादर करावे. अधिक माहितीसाठी संपर्क  मो.नं. 8857840783 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे   प्रसिध्दीपत्रकाद्वारे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment