Thursday 1 December 2022

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन स्विकारण्यास परवानगी

 


 

       जालना,दि.1(जिमाका):- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे तसेच ऑफलाइन नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

         राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील. तहसीलदारांनी नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छूक उमेदवारांना उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी तसेच पारंपारीक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये आरओ लॉगीनमधून भरून घेण्यात यावे. याची संपुर्ण जबाबदारी संबंधीत तहसीलदार यांची राहील, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शर्मिला भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                     -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment