Monday 12 December 2022

बदनापुर शहरात राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई; एकुण 5 हजार 700 रुपयांचा दंड वसुल

 


जालना, दि.12 (जिमाका) :-  बदनापूर शहरात सोमठाणा नाका ते बदनापुर पोलीस चौकी दरम्यान विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा, तंबाखु , मावा, जर्दा, खर्रा आणि सुट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा 2003 कायदा अंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले. यामध्ये कायद्याअंतर्गत कलम 4, कलम 5, कलम 6 ( अ, ब ) नुसार एकुण 8 पानटपऱ्यांवर कारवाई करुन 5 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जालना शहरानंतर बदनापुर येथे देखील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग, बदनापुर स्थानिक पोलीस चौकीचे पोलीस निरिक्षक श्री. बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ एस. पी. तनपुरे व जी. एन. गोशिक, बदनापुर येथील एएसआय श्री. कांबळे, जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे यांच्याद्वारे करण्यात आली. असे जिल्हा शल्यचिकित्सक जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment