Friday 9 December 2022

जिल्ह्यात 12 ते 18 डिसेंबरपर्यंत क्रीडा सप्ताहाचे आयोजन

 


 

जालना दि. 9 (जिमाका) : जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात दि.12 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या क्रीडा सप्ताहात विविध क्रीडा प्रकारासह खेळाशी संबंधित इतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

क्रीडा सप्ताहामध्ये सोमवार दि.12 डिसेंबर 2022 रोजी फ्री हॅण्ड सर्विस 6 वर्षापर्यंतच्या पुर्व प्राथमिक गटासाठी तर योगाभ्यास, फुटबॉल, खोखो व मैदानी खेळाच्या स्पर्धा प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे होईल. मंगळवार दि.13 डिसेंबर रोजी  मनोरंजनात्मक खेळ पुर्व प्राथमिक गटासाठी तर लंगडी, डॉजबॉल,लंगोरी, लेझीम, संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, टिपऱ्या, लिंबु चमचा असे पारंपरिक खेळाच्या स्पर्धा प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व कै.जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय जालना येथे तर मंगळागौरीचे खेळ, फुलबॉल, योगा, दोरी उड्या व धावणे या स्पर्धा जैन इंग्लिश स्कुल अंबड व कै.नानासाहेब पाटील विद्यालय पांगरी होईल. बुधवार दि.14 डिसेंबर रोजी नृत्य स्पर्धा पुर्व प्राथमिक गटासाठी तर सामुहिक कवायती एरोबिक्स, झुंबा, डंबेल्स रिंग कवायत प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जालना येथील जेईएस महाविद्यालय रोडवरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत करण्यात आले आहे. गुरुवार दि.15 डिसेंबर रोजी 30 मीटर धावणे व रिले स्पर्धा पुर्व प्राथमिक गटासाठी तर 50 मीटर धावणे, रिले, कबड्डी, खोखो, क्रिकेट प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जालना येथील देवगिरी इंग्लिश स्कुल व पार्थ कनिष्ठ महाविद्यालय शिवणी तांडा येथे होणार आहे. शुक्रवार दि.16 डिसेंबर रोजी उभे राहुन उंच उडी मारने ही स्पर्धा पुर्व प्राथमिक गटासाठी तर क्रीडा व निरोगी आरोग्य जीवनशैलीच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जालना येथील जेईएस महाविद्यालय र्रोडवरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत होणार आहेत. शनिवार दि.17 डिसेंबर रोजी उभे राहुन लांब उडी मारणे ही स्पर्धा पुर्व प्राथमिक गटासाठी तर  खेलो इंडिया अंतर्गत शालेय स्तरावर शारिरीक क्षमता मुल्यमापन चाचण्या प्राथमिकपासून ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा संकुल जालना येथे घेण्यात येतील. दि.18 डिसेंबर रोजी लिंबु चमचा शर्यत व बेडूक उड्या मारणे ही स्पर्धा पुर्व प्राथमिक गटासाठी तर  राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचे समावेश संवाद आहार विषयक तसेच मानसिक आरोग्य विषयक तज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम जालना येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व कै.जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात घेण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment