Wednesday 7 December 2022

जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा सुरु

 

         

 

जालना, दि.7 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,  पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अंकुशराव टोपे महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा सन 2022-23 ला मंगळवार दि.6 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व 17 व 19 वर्षाआतील मुली यांच्या स्पर्धेस सुरूवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये आठ तालुक्यातून विजयी संघ सहभागी झाले  असून आठ तालुक्यातून मुलींचा संघही सहभागी झाला आहे.

स्पर्धेला क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, प्रा. डॉ. संजय शेळके, प्रा. डॉ. भुजगंराव डावकर, यशवंत कुलकर्णी, प्रा. विक्रांत ठाकूर, प्रा. राजू पवार, रमेश माढरे, प्रमोद राठोड, परिमल पेठगांवकर, विजय गाडेकर, कृष्णा भुतेकर, किरण पाटील, दीपक राणा, सचिन चव्हाण, विक्रांत कनोजे, आकाश भक्त, रोहीत कुकडे, प्रविण विटेकर, सचिन सापा, दिपेश रिघे, आशिष साबळे आदि उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वजण परिश्रम घेत असून  स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment