Thursday 1 December 2022

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

 


                                           

जालना दि. 1 (जिमाका) :-    जागतिक एड्स दिनानिमित्त  दि. 1 डिसेंबर  रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सामान्य  रुग्णालय, जालना यांच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात करण्यात आले होते. रॅलीस अपर जिल्हाधिकारी  अंकुश पिनाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.अहीर, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, डॉ. मनीष सहानी,  राजेश गायकवाड, तनुजा पाटील, विलास कांबळे, प्राजक्ता जोशी, विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रॅली यशस्वी केली.

रॅलीत  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेहरु युवा केंद्र, श्री. सरस्वती भुवन प्रशाला, जालना समाजकार्य महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, अंकुशराव टोपे महाविद्यालय, मत्स्योदरी महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थींनी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर आदि महाविद्यालयासह इतरांनी सहभाग नोंदविला. यावेळी विविध महाविद्यालयासह शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीची उपस्थिती होती.  अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र गायके यांनी यावर्षीची थीम "आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता" अशी असल्याचे सांगून एडस निर्मुलनाबाबत यावेळी मार्गदर्शन केले. रॅलीच्या सुरुवातीस एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटवून समानता आणणे या विषयावर दि.22 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी व चित्रकला/पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना एचआयव्ही एडसबाबात शपथ देण्यात आली. नागरिकांसह युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कलापथकाच्या माध्यमातून  सादरीकरणाद्वारे जनजागृती करण्यात आली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (डापकु), सामान्य रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रॅली यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment