Tuesday 6 December 2022

"दुचाकी स्वारांसाठी प्राणरक्षक सप्तसूत्री" पत्रकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

 





 

                जालना दि. 6 (जिमाका) :-   मुख्य सचिव आणि परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या रस्ता सुरक्षा निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, जालना मार्फत,   "सुरक्षित रस्ते , समृद्ध जालना " हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट जिल्ह्यातील रस्ते अपघातात होणाऱ्या  मृत्यूदरात घट घडवून आणणे हे आहे.

या कार्यक्रमाचा पहिला उपक्रम म्हणून जालना- अंबड - शाहगड  या मुख्य अपघातप्रवण रस्त्यावर  दुचाकीचालकांच्या  वाहन चालविण्याच्या सवयीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी या  रस्त्यावर वाहन चालकांनी काय खबरदारी घ्यावी याचे पत्रक उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहे. या "दुचाकी स्वारांसाठी प्राणरक्षक सप्तसूत्री" पत्रकाचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे,  मोटार वाहन निरीक्षक सचिन  झाडबुके , सुनील गीते यांची उपस्थिती होती . सदर पत्रके दुचाकीस्वारांना अपघाताची भीषणता आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत खूप मार्गदर्शक ठरतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

जिल्ह्यात अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकी चालकांचे मोठे प्रमाण आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी खबरदारी म्हणुन पत्रकात नमूद सप्तसूत्री पाळली तर अपघाती मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment