Thursday 1 December 2022

ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी 2 डिसेंबर रोजी कार्यशाळा व आरोग्य तपासणी

 


 

जालना दि. 1 (जिमाका) :-   समता पर्वच्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे सकाळी 10.00 वाजता ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृतीयपंथी यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.  कार्यशाळेसाठी उपस्थितांचे तज्ञ डॉक्टर यांचे पथक आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच   जिल्हा शलय चिकित्सक  डॉ. राजेंद्र गायके व  जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. विवेक खतगावकर हे आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृतीयपंथी यांनी दि. 2 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे सकाळी 10.00 वाजता कार्यशाळेसाठी उपस्थित रहण्याचे तसेच आरोग्य शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन अमित घवले सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment