Friday 2 December 2022

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांची माहितीची कार्यशाळा व आरोग्य शिबीर संपन्न

 






 

 जालना दि. 2 (जिमाका) :-   संविधान दिन  २६ नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर 2022 या कालावधीत समता पर्वच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे शुक्रवार दि. २ डिसेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांची माहितीची कार्यशाळा व आरोग्य शिबीर संपन्न झाले. या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा, दिव्यांगांचा व तृतीयपंथीयांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य शिबीरामध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली.  

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले.  कार्यक्रमाचे मुख पाहुणे मानसोपचार तज्ञ डॉ. पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांनी दिव्यांगासाठी असलेल्या योजनाबाबत कार्यशाळेत माहिती दिली. जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंचचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कंकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस जिल्हा ज्येष्ठ नागरिक मंच, जालना, उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्था जालना व उज्वल बहुउद्देशिय सेवाभावी संथा जालना या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष अधिकारी दत्तात्रय बाघ यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे ज्येष्ठ नागरिकांचे, तृतीयपंथीय, दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी यांचे आभार मानले. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment