Friday 2 December 2022

अनुसूचित जातीसाठी कार्यान्वित घटकांची कार्यशाळा; युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती ठरली लक्षवेधी

 


 

जालना दि. 2 (जिमाका) :-   समता पर्वाच्या निमित्ताने अनुसूचित जातीच्या घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग युवा गटाची कार्यशाळा या विषयावर दि. 1 डिसेंबर 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस संबंधित घटकांसह युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविल्याने कार्यशाळा लक्षवेधी ठरत अतिशय उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेचे अध्यक्ष जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था समन्वयक भारती सोसे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक सोनाली शेळके,  भगवान कुदर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक कैलास काळे, पत्रकार अच्युत मोरे, उद्योजिका संजीवणी जाधव आदि उपस्थित होते.

भारताची स्वतंत्र राज्यघटना दि. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करुन दि. 26 जानेवारी, 1950 पासून अंमलात आली. सर्व नागरिकांना संविधानाची ओळख करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी 26 नोंव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संविधान निर्मीतीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन ते दि. 6 डिसेंबर, 2022 डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पर्यंत समता पर्व साजरे करण्याबाबत निर्देश आहेत.

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या सोनाली शेळके यांनी नवउद्योजक तरुण-तरुणींना त्यांच्या कार्यालयामार्फत मोफत प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या साधारणत: 26 प्रशिक्षणाबाबत माहिती दिली, तसेच व्यवस्थापक भारती सोसे यांनी जिल्हा उद्योजक केंद्रामार्फत युवा गटासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेचे महत्व विशद केले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन समतादुत पारु राठोड यांनी केले तर आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी मानले. कार्यशाळेचे प्रस्ताविक जिल्हा प्रकल्प संचालक मुंजाजी कांबळे यांनी केले. कार्यशाळेस संबंधित घटकांसह जिल्ह्यातील युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

                            -*-*-*-*-

No comments:

Post a Comment