Wednesday 7 December 2022

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेस प्रारंभ

 


 

जालना, दि.7 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा सन 2022-23 दि. 5 डिसेंबर 2022 रोजी गुरूरामचरण उस्ताद आखाडा, जालना येथे 14, 17 व 19 वर्षाआतील मुले व मुलींच्या स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.  या स्पर्धेमध्ये आठ तालुक्यातुन विजयी पहिलवान सहभागी झाले  असून  आठ तालुक्यातून मुलीही सहभागी झाल्या आहेज.

स्पर्धेला जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्ष मदनलाल भगत, सचिव प्रा. डॉ. दयानंदजी भक्त, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, दीपक भुरेवाल, अॅड. मारोती आटोळे,  शिवाजी काळे, यशवंत कुलकर्णी, प्रा. वाहेद पटेल, यशवंत जगदाळे, भागवत कडूळे, सचिन मोहिते, सरपंच शेरेपाटील, क्रीडा शिक्षक, पालक, खेळाडू आदि उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच हे यशस्वी भूमिका पार पाडत आहेत. प्रा. डॉ. दयानंद भक्त, शाम काबूलीवाले, प्रतिक भक्त, चरण सले, सर्वजण परिश्रम घेत असून या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment