Tuesday 6 December 2022

रेशीम चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दाखविली हिरवी झेंडी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


 


 

जालना दि. 6 (जिमाका) :-  जालना जिल्हृयात महारेशीम अभियान-2023 ची सुरूवात झाली असुन नवीन तुती लागवड करणारे शेतकरी दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत नोंदणी करू शकतात. रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी करीता दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महारेशीम अभियान-2023 अंतर्गत रेशीम चित्ररथास  हिरवी झेंडी दाखवुन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जालना जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, रेशीम वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक एस.आर.जगताप व क्षेत्र सहाय्यक एस.यु.गणाचार्य व शेतकरी यांची उपस्थीती होती. महारेशीम अभियान -23 अंतर्गत रेशीम विभाग, कृषी विभाग, रो.ह.यो., सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त सहभागामधुन  जिल्ह्यातील विविध भागात कर्मचारी गावोगावी जावुन रेशीम उद्योगाचे उत्पादन, वैशिष्टे, फायदे व रेशीम उद्योगाकरीता असणाऱ्या शासकिय योजना- सुविधा ई. माहिती देवुन सन -2023 मध्ये नवीन तुती लागवड करू इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करणार आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी वेळेत झाल्यामुळे या शेतकऱ्यांकडे माहे जानेवारी-फेब्रुवारी माहिन्यात तुती रोपांची नर्सरी करण्यात येते, त्यांच्या योजनांचे प्रस्तावास वेळेत तांत्रिक व प्रशाकीय मान्यता देणे शक्य होते.

रेशीम उद्योगातुन शेतकऱ्याचे उत्पादन इतर पारंपारीक पींकापेक्षा अधिक होत असल्यामुळे जालना जिल्ह्यातील जास्तीजास्त शेतकऱ्यांनी सन-2023 चे नवीन तुती लागवडीसाठी रेशीम कार्यालयाकडे नोंदणी करावी, शासकिय योजनेची सर्वतोपरी मदत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल  असे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. जालना जिल्हृयात चांगल्या दर्जाचे व उबवन केलेले अंडीपुंज पुरवठा करण्याची सुविधा,उत्कृष्ठ चॉकी केंद्र, हमी बाजारभावाची बाजारपेठ, उच्च दर्जाचे सुत उत्पादन करणारे ॲटोमॅटीक रिलींग केंद्र अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत महारेशीम अभियान मध्ये नोंदणी करावी असे आवाहन रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment