Monday 5 December 2022

जिल्हा प्रशासनाचे उपस्थित राहण्याबाबत आवाहन सशस्त्र सेना ध्वजदिन-2022 निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ

 


 

जालना, दि.5 (जिमाका) :-  जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन-2022 निधी संकलन शुभांरभाचा कार्यक्रम बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता सैनिक संकुल, महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , जिल्हा क्रीडा संकूल समोर,  जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर पिता, वीर माता, माजी सैनिक, विधवा पत्नी, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार, उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी केशव नेटके यांनी केले आहे .

भारतमातेच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दुर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी व त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातुन सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस " ध्वजदिन " म्हणुन साजरा करण्यात येतो व त्या निमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ध्वजदिन निधी संकलन केले जाते. दर वर्षीप्रमाणे जालना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन-२०२२ निधी संकलन शुभारंभ बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता  सैनिक संकुल, महासैनिक लॉन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , क्रीडा संकूल समोर,  जालना येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा मीना, पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमानिमित्ताने शहीद जवानांना श्रध्दांजली, देशाच्या सीमांचे रक्षण करतांना प्राणाचे बलीदान देवून शहिद झालेल्या सैनिकांच्या विरपत्नी, विरमाता व विरपिता यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये सैनिकांविषयी जनजागृती व आपुलकी निर्माण करुन उत्कृष्ट कामगिरी करुन ध्वजदिन २०२१ निधी संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक व महारथी महाराष्ट्राचे पुस्तकांचे वितरण, कार्यालय प्रमुख व संबंधीत कर्मचाऱ्यांस प्रशस्तीपत्र वाटप तसेच माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, आर्थिक मदतीचे धनादेश वाटप, गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment