Monday 12 December 2022

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई; एकुण 16 हजार 580 रुपयांचा दंड वसुल पानटपऱ्यांवर कारवाईचा धडाका

 


जालना, दि.12 (जिमाका) :- शहरातील विविध ठिकाणी अवैध्यरित्या गुटखा , तंबाखु , मावा , जर्दा , खर्रा आणि सुट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या  व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा 2003 कायदाअंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले . यामध्ये कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार एकुण 26 पानटपऱ्यांवर कारवाई करुन 16 हजार 580 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संपुर्ण जिल्हाभरात यापुढेही जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.  तरी पानटपरी धारकांनी अवैधरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करु नये. सदर कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ एस.पी.तनपुरे व जी.एन. गोशिक, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अभिजित संगई यांच्याद्वारे करण्यात आली.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment