Monday 5 December 2022

समता पर्वच्या निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न

 

     

 

जालना, दि.5 (जिमाका) :-   सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, बौध्दवासी दशरथरावजी व्यायाम व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, जालना यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी रेल्वे स्टेशन, जालना येथे रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येऊन रक्तदान शिबीराचे उ्दघाटन करण्यात आले.

संविधान निर्मीतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्यादृष्टीने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 संविधान दिन ते दिन 6 डिसेंबर, 2022 डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पर्यंत समता पर्व साजरे करण्यात येत आहे. रक्तदान शिबीरामध्ये एकुण 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण व बौध्दवासी दशरथरावजी व्यायाम व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, जालना येथील कर्मचाऱ्यांनी सुध्दा रक्तदान केले. कार्यक्रमात रेल्वे पोलीस निरीक्षक विजय वाघ, अशोक शहाणे, उद्योजक, जालना, बंडु सुरडकर, पत्रकार, तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना कार्यालयातील अतिश ससाणे, कार्यालय अधिक्षक, संतोष वाघ, वरिष्ठ लिपीक, अमोल चाबुकस्वार, कनिष्ट लिपीक तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, बौध्दवासी दशरथरावजी व्यायाम व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, जालना यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment