Tuesday 6 December 2022

वाळु घाट परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू

 


 

जालना दि. 6 (जिमाका) :-  जिल्ह्यात अंबड व घनसावंगी तालुक्यातील अवैध वाळु चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत नदीपात्रांमध्ये वाळुचोरी रोखण्याकरीता व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात आले आहे, असे आदेश अंबडचे उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी जारी केले आहेत.

अनुक्रमे अंबड तालुका -आपेगाव, बळेगाव, गोरी, गंधारी, शहागड, साष्टपिंपळगाव, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु. गोंदी, हसनापुर, कोठाळा खु., साडेगाव, इंदलगाव, गंगाचिंचोली (सर्व गोदावरी नदीपात्र) तसेच आवा-अंतरवाला, माहेरभायगाव, चिकनगाव, साडेसावंगी, मठपिंपळगाव (दुधना नदीपात्र) तसेच घनसावंगी तालुका- जोगालादेवी, रामसगाव, मंगरुळ, भोगगाव, शिवणगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, राजाटाकळी (गोदावरी नदीपात्र), रांजणी, मुढेगाव (दुधना नदीपात्र) येथील वाळुघाटांचे लिलाव झालेले नसून  या वाळुघाटातुन वाळुची अवैध चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील कापडणीस यांना प्राप्त फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारान्वये अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनुक्रमे अंबड तालुका- आपेगाव, बळेगाव, गोरी, गंधारी, शहागड, साष्ट पिंपळगाव, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु. गोंदी, हसनापुर, कोठाळा खु., साडेगाव, इंदलगाव, गंगाचिंचोली (सर्व गोदावरी नदीपात्र) तसेच आवा-अंतरवाला, माहेरभायगाव, चिकनगाव, साडेसावंगी, मठपिंपळगाव (दुधना नदीपात्र) तसेच घनसावंगी तालुका- जोगालादेवी, रामसगाव, मंगरुळ, भोगगाव, शिवणगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, राजाटाकळी (गोदावरी नदीपात्र), रांजणी, मुढेगाव (दुधना नदीपात्र) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत  लागु राहील. आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment