Thursday 1 December 2022

प्लास्टीक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादन कंपनीच्या विक्रेते आणि वितरकांना नोंदणी करण्याचे आवाहन


 

जालना, दि. 1 ( जिमाका ) :-  एकात्मिक फलोत्पादन  विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषि योजनेतून सामूहिक शेततळे आणि वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत प्लास्टीक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादन कंपन्यांकडून  विक्रेते आणि वितरकांची नोंदणी करण्याकरिता राज्यस्तरावरून याबाबत सुचना प्राप्त झाल्या असून  नोंदणीची प्रक्रिया दि.1 ते 15 डिसेंबर 2022  पर्यंत राबविण्यात येणार आहे. याकरिता  विहित नमुन्यातील अर्ज नोंदणी करावी. प्लास्टीक फिल्म पुरवठा करणाऱ्या विक्रेता किंवा वितरकांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोतीबाग समोर, बचत भवन, जालना या कार्यालयास अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत दि.15 डिसेंबर 2022 पुर्वी नोंदणीकरिता अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  भिमराव रणदिवे यांनी केले आहे. 

           नोंदणीकरिता रिइनफोसंड एचडीपीई जाओमेम्बर आयएसआय (आयएस 15351:2015) 500 मायक्रॉन प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या  उत्पादन कंपन्यांचे विक्रेते आणि वितरकांना पुढीलप्रमाणे कागदपत्रे नोंदणी अर्जाबरोबर सादर करणे बंधनकारक आहे. फोटोसह वितरक नोंदणी अर्ज,दोन लक्ष रूपये बॅंक स्टॅंम्प पेपरवरील मुळ बॅंक गॅरंटी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,जालना यांच्या नावे प्रत आणि एक  झेरॉक्स  प्रत, वितरकांने  शंभर रूपये किंमतीच्या स्टॅंम्प पेपरवर नोंदणीबाबत अटी व शर्ती करिता करारनामा, मान्यताप्राप्त उत्पादन कंपनीकडील वितरक प्रमाणपत्र,मान्यताप्राप्त कंपनीचे राज्यस्तरीय नोदंणी प्रमाणपत्र कंपनी प्रतिनिधीने साक्षाकिंत केलेली प्रत,वितरक आणि उत्पादक कंपनी यांच्यामधील करारनाम्याची साक्षाकिंत प्रत,वितराकाचा दुकानस्थळ किंवा जागेचा पुरावा आठ अ, ग्रामपंचायत अथवा नगरपालिका मालमत्ता पत्रक,दुकान भाडयाने घेतले असल्यास भाडेकरार किंवा जागा मालकांचे नाव असलेला जागेचा उतारा अथवा ग्रामपंचायत,नगरपालीका  कर भरणा झेरॉक्स पावती प्रत. दुकान नोंदणी प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स प्रत.जि.एस.टी प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत.आधार कार्ड झेरॉक्स प्रत.बॅक पासबुक झेरॉक्स प्रत आदी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment