Monday 5 December 2022

जालना शासकीय तंत्रनिकेतमध्ये तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 


 

जालना, दि.5 (जिमाका) :-  शासकीय तंत्रनिकेतन जालना आणि जी. टी. टी. फाऊंडेशन पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्रनिकेतन जालना येथे औद्योगिक क्षेत्राशी निगडीत शिक्षण संपादन करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी  जीवन कौशल्य विकास व रोजगार सक्षमता प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.  

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याना स्व: जाणीव, स्वतःची ओळख, ध्येय निश्चिती, संभाषण कौशल्य, श्रवण कौशल्य, समस्या निराकरण व निर्णय क्षमता कौशल्य, वेळेचे व कामाचे नियोजन, जबाबदारी व कर्तव्ये, योग्य रोजगार संधीसाठी सामाजिक माध्यमे व ई- मेल नैतिकता यांचा उपयोग व वापर, मुलाखत कौशल्ये व नैतिकता इत्यादी सर्व मुद्द्यांची सखोल व महत्वपूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात जीवन कौशल्ये प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवी असणाऱ्या प्रशिक्षका मार्फत पुरविली गेली आहेत.

 या प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थी कौशल्यपूर्ण व्हावेत , त्यांच्या राहणीमानात व संभाषणात चांगले व सकारात्मक बदल व्हावे, तसेच रोजगाराच्या संधीसाठी ते स्वतः तयार होतील हे सर्व गुण कौशल्ये वापरून त्यांच्या प्रगतीत भर पाडतील ही या कार्यक्रमाची उद्देश प्राप्ती आहे. या संपूर्ण कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतन जालनाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. डी. वाघमारे, जी.जी.गोरे, आर.आर.खिराडे , श्रीमती वाघमारे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. ए. पाटील यांनी केले. तसेच प्रशिक्षक म्हणून अनुभवी अझहर शेख यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे आयोजन GFT फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पवार, प्रशिक्षक समन्वयक  आकाश बोधक व औरंगाबाद विभाग प्रमुख रविंद्र बोरडे यांच्यामार्फत करण्यात आले होते. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment