Friday 2 December 2022

दिव्यांग दिनानिमीत्त 3 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

 


जालना दि. 2 (जिमाका) :-  जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे ३ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जालना येथील श्री. गुरु गणेश दृष्टीहीन विद्यालयाच्या मैदानावर सकाळी ११ वाजेपासुन सुरु होणार आहेत. पारितोषिक वितरण सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेस  मोठया संख्येने उपस्थित राहुन दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील एकुण १२ दिव्यांगाच्या विशेष शाळामधील ३५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून हे विद्यार्थी आपल्या क्रिडा गुणांचे प्रदर्शन करणार आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment