Thursday 5 January 2023

जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न

 


जालना,दि. 5 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा  संचालनालय अधिनस्त क्रीडा व युवक सेवा , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद , जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वर्षे वयोगटाच्या आतील युवक-युवतींकरिता जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल हॉल, जालना येथे करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2022-23 चे उद्घाटन मुख्याधिकारी संजय खांडेकर यांच्या हस्ते नटराज मुर्ती पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या उपस्थिती होती. जिल्हास्तर युवा महोत्सवाकरिता लोकगीत व लोकनृत्य या कला प्रकारात जिल्ह्यातील संघानी सहभाग घेऊन आपले कला सादरीकरण केले. या स्पर्धेत लोकगीताबरोबर लोकनृत्यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळा, जालना यांनी संपादीत केला. जिल्हास्तर युवा महोत्सवासाठी राजेभाऊ मगर, श्रीमती रेखा गतखणे, संदिप इंगोले, श्रीमती भक्ती पवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे  यांच्यासह  संतोष प्रसाद, सोपान शिंदे, नवनाथ गायकवाड, हारूण खान, ईस्माईल शेख आदींनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment