Friday 20 January 2023

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण

 


जालना,दि. 20 (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम गुरुवार, दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहण राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे.

तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण होणार आहे.  शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्था इ. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखासह ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शर्मिला भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment