Wednesday 11 January 2023

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळयानिमित्त वाहतूक मार्गात बदल

 


जालना, दि. 11 (जिमाका) :- राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा सिंदखेडराजा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे दि. 12 जानेवारी 2023 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यास देशभरातुन तसेच राज्यभरातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतात. तसेच या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय, सामाजिक, संघटनांचा सहभाग असतो. हा सोहळा जालना-नाव्हा-सिंदखेड राजा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 सी वर आहे.

            या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने  जड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमानासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये  पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना प्राप्त अधिकारान्वये  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 सी वरील जालना-नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 11 जानेवारी 2023 रोजीच्या रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 13 जानेवारी 2023 रोजीच्या 00.30 वाजेपर्यंत खालील सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

            अंबड रोड, मंठा रोड, भोकरदन रोड व औरंगाबादकडून येणारी जड वाहतूक ही जालना-नाव्हा चौफुली येथुन सिंदखेड राजा मार्गे मेहकर-वाशिमकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग म्हणजे  कन्हैयानगर जालना-देऊळगाव राजा मार्गे चिखली-मेहकर-वाशिमकडे जाईल.

अंबड रोड, मंठा रोड, भोकरदन रोड व औरंबादकडून येणारी हलकी वाहतुक ही जालना-नाव्हा चौफुली येथून सिंदखेड राजा मार्गे किनगांव राजा, दुसरबीड, बीबी, लोणारकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग म्हणजे कन्हैया नगर जालना-देऊळगाव राजा मार्गे चिखली-मेहकर –वाशिमकडे जाईल किंवा कन्हैयानगर जालना-देऊळगांव राजा मार्गे अंढेरा-मलकापुर पांग्रा मार्गे दुसरबीड-मेहकर-वाशिमकडे जाईल.

            वरील मार्गाची जड वाहतुक 11 जानेवारी 2023 रोजीच्या रात्री  12.01 वाजेपासून ते दि. 13 जानेवारी 2023 रोजीच्या 12.30 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिले आहेत.  

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment