Friday 6 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

 


 

जालना,दि. 6 (जिमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  निवडणूकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारीची दखल घेण्याकरीता निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच दि. 1 जानेवारी 2023 पासून ते निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यंत जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या ठिकाणी 24×7 तत्वावर स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात संपर्कासाठी दूरध्वनी क्र.02482--223132 असा आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी       डॉ. विजय राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

            नियंत्रण कक्षात दि. 3 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी हे नियंत्रण कक्षात उपस्थित राहून दुरध्वनी क्र.02482--223132 व ई-मेल आयडी dydeojalna22@gmail.com यावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी नोंदवहीत नोंद करतील. कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे देतील. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आदेश जारी केला आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment